कृती: खोबरे, तीळ
भाजून घ्यावे. मग तळलेला कांदा, खोबरे, तीळ, आले,
लसून व थोडी कोथिंबीर घालून सर्व बारीक वाटून
घ्यावे. पातेल्यात तेल घालावे
हिंग-मोहरीची फोडणी देऊन त्यावर कांदा घालावा. कांदा जर परतला की त्यावर टोमॅटो घालावा. तेल सुटेपर्यंत चांगले परतावे . नंतर त्यावर हळद व मटकी घालावी . मटकी चांगली ७-८ मिनिटे परतावी म्हणजे मटकी चा जो एक प्रकारचा वास येतो तो नाहीसा होतो. आता त्यावर आपण वाटून ठेवलेला मसाला घालावा. ते सर्व छान तेल सुटे पर्यंत परतावे. नंतर अर्धा टी-स्पून चिलीमिली मसाला घालावा. चवीनुसार कांदा लसुन मसाला घालावा म्हणजे २ चमचे तरी असावा.
नंतर मीठ घालावे. सर्व परतून घ्यावे. ४ ते ५ वाटया गरम पाणी घालावे. भाजीला उकळी आली की गॅस कमी करून मटकी शिजू द्यावी. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवावा. उकळी आली कि गॅस बंद करावा. या मिसळीला तेल जरा जास्तच घालावे म्हणजे छान तररी येते. तिखट आपल्या चवीनुसार टाकावे. मिसळ खाण्यास देताना एका बाऊलमध्ये मटकीची भाजी घालावी. त्यावर शेव चिवडा घालावा. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी बारीक शेव घालावी. लिंबाची फोड व ब्रेड बरोबर डिश सर्व्ह करावी. बरोबर एक तररी ची वाटी म्हणजे रस्सा द्यावा.

No comments:
Post a Comment