Thursday, October 3, 2013

Recipe of Pumpkin Kofta Curry/भोपळ्याची कोफ्ता करी

Pumpkin Kofta Curry/भोपळ्याची कोफ्ता करी
Recipe Courtesy: Mrs. Sushila Katare (Author of Khadya Sanskruti)

कोफ्त्यासाठी साहित्य:
१/२ किलो लाल भोपळा, ४-५ टेबल स्पून डाळीचे पीठ, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १/२ लिंबू, हळद आणि मीठ चवीनुसार

मसाल्यासाठी साहित्य: ४-५ हिरव्या मिरच्या, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी पुदिना, पाव जुडी पालक, दीड इंच आले, १ चमचा पल्लविज स्पाईसेसचा शाही गरम मसाला, पाव चमचा हळद

ग्रेव्हीसाठी साहित्य: १ नग कांदा, २ चमचे अनारदाणा (डाळिंब)

कृती:
१) मसाला बारीक वाटून बाजूला ठेवावा
२) कांदा उभा चिरून वेगळा ठेवावा
३) लाल भोपळा किसून त्यातील पाणी पिळून टाकावे. त्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या, डाळीचे पीठ, हळद, जिरे, पल्लविज स्पाईसेसचा शाही गरम मसाला, लिंबाचा रस घालून छोटे छोटे गोळे करून मंद अग्नीवर टाळून घ्यावेत
४) थोड्याश्या तेलावर कांदा परतून घ्यावा. बदामी रंगाचा झाल्यावर वाटलेला मसाला घालून परतून घ्यावा. नंतर बेताचे पाणी घालून उकळून घ्यावा. वाटलेला अनारदाणा व मीठ घालावे. रस्सा दाट झाल्यावर तळलेले कोफ्ते घालून एक उकळी आल्यानंतर गरम सर्व करावा.

No comments:

Post a Comment