कृती: कांदे लांब उभे चिरून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. खोबरे भाजून घ्यावे. पातेल्यामध्ये तेल घालून त्यावर वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतावा. त्यावर पल्लवी स्पायसेस चिली मिली मसाला, कांदालसून मसाला, मीठ घालावे. २ मिनटे परतून त्यावर २ ते अडीज फुलपात्रे पाणी घालावे व रष्याला
१ उकळी आली की गॅस कमी करावा. मंद आचेवर रस्सा छान उकळू द्यावा. हा रस्सा थोडा पातळच करावा तसाच छान होतो. जेवायला वाढताना डिशमधे गरमा गरम रस्सा घालावा. थोडी शेव घालावी व चपाती भाकरी बरोबर खाण्यास घ्यावे सोबत कांदा, लिंबू मिरचीचा ठेचा घ्यावा.
No comments:
Post a Comment