Showing posts with label blog of pallavis spices. Show all posts
Showing posts with label blog of pallavis spices. Show all posts

Monday, May 27, 2013

शेवची भाजी (Shev Bhaji)

साहित्य: वाटी किसलेले सुखे खोबरे, मोठे कांदे, चमचे कांदा-लसुन मसाला, किंवा थोडे तिखट जास्त हवी असल्यास गावरान मराठा मसाला, कोथिंबीर, आले इंच, गाठीशेव किंवा लांब जाड शेव, विलायची, - लवंगा, चमचा धने, हळद, मीठ, तेल, - लसुन पाकळ्या.

कृती: कांदे लांब उभे चिरून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. खोबरे भाजून घ्यावे. पातेल्यामध्ये तेल घालून त्यावर वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतावा. त्यावर पल्लवी स्पायसेस चिली मिली मसाला, कांदालसून मसाला, मीठ घालावे. मिनटे परतून त्यावर ते अडीज फुलपात्रे पाणी घालावे रष्याला  उकळी आली की गॅस कमी करावा. मंद आचेवर रस्सा छान उकळू द्यावा. हा रस्सा थोडा पातळच करावा तसाच छान होतो. जेवायला वाढताना डिशमधे गरमा गरम रस्सा घालावा. थोडी शेव घालावी चपाती भाकरी बरोबर खाण्यास घ्यावे सोबत कांदा, लिंबू मिरचीचा ठेचा घ्यावा.

कोल्हापुरी मिसळ (Kolhapuri Misal)

साहित्य: बारीक चिरलेले कांदे, वाटी मोड आलेली मटकी, बारीक चिरलेले टोमॅटो,   मोठे कांदे लांब लांब चीरून ब्राउन रंगावर तळलेले ते लसूण पाकळ्या, हिंग, मोहरी, हळद, फोडणीसाठी तेल, मीठ गरजे प्रमाणे कांदा लसूण मसाला, पल्लवी स्पायसेसचा चिली मिली मसाला (तिखट हवे असल्यास पल्लवी स्पायसेसचा गावरान मराठा मसाला) मध्यम वाटी किसलेले सुके खोबरे, चमचे तीळ, अर्धा इंच आले.

कृती: खोबरे, तीळ भाजून घ्यावे. मग तळलेला कांदा, खोबरे, तीळ, आले, लसून व थोडी कोथिंबीर घालून सर्व बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात तेल घालावे
हिंग-मोहरीची फोडणी देऊन त्यावर कांदा घालावा. कांदा जर परतला की त्यावर  टोमॅटो घालावा. तेल सुटेपर्यंत चांगले परतावे . नंतर त्यावर हळद व मटकी घालावी . मटकी चांगली ७-८ मिनिटे परतावी म्हणजे मटकी चा जो एक प्रकारचा वास येतो तो नाहीसा होतो. आता त्यावर आपण वाटून ठेवलेला मसाला घालावा. ते सर्व छान तेल सुटे पर्यंत परतावे. नंतर अर्धा टी-स्पून चिलीमिली मसाला घालावा. चवीनुसार कांदा लसुन मसाला घालावा म्हणजे २ चमचे तरी असावा.
नंतर मीठ घालावे. सर्व परतून घ्यावे. ४ ते ५ वाटया गरम पाणी घालावे. भाजीला उकळी आली की गॅस कमी करून मटकी शिजू द्यावी. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवावा. उकळी आली कि गॅस बंद करावा. या मिसळीला तेल जरा जास्तच घालावे म्हणजे छान तररी  येते. तिखट आपल्या चवीनुसार टाकावे. मिसळ खाण्यास देताना एका बाऊलमध्ये मटकीची भाजी घालावी. त्यावर शेव चिवडा घालावा. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी बारीक शेव घालावी. लिंबाची फोड व ब्रेड बरोबर डिश सर्व्ह करावी. बरोबर एक तररी ची वाटी म्हणजे रस्सा द्यावा.