Showing posts with label veg recipe from pallavi's spices. Show all posts
Showing posts with label veg recipe from pallavi's spices. Show all posts

Thursday, October 3, 2013

Recipe of Chole Bhature/छोले भटुरे

Chole Bhature/छोले भटुरे
Recipe Courtesy: Mrs. Shruti Goswami (Author of Recipe's Delight)

साहित्य:
२०० ग्रम कबुली चणे, ३ मध्यम कांदे - २ उभे चिरून, १ तळून वाटून, २ हिरव्या मिरच्या (४ तुकडे केलेल्या), ८-१० लसूण पाकळ्या व १ इंच आले वाटून, २ मध्यम टोमाटो (उकलीच्या पाण्यातून काढून, साल काढून रस करून घ्या) १ टी-स्पून धने पावडर, ५ टी-स्पून तूप अथवा तेल, १ टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा चिली मिली मसाला/गावरान मराठा (तिखट हवे त्या नुसार), १/२ टी-स्पून हळद, २ टी-स्पून चना मसाला, पाव वाटी चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ

कृती:
कोंबट पाण्यात चणे ६-८ तास भिजत ठेवा. ५ ते ६ कप पाणी व किंचित सोडा घालून चणे कुकर मध्ये शिजवून घ्या. मिरची, वाटलेले आले लसूण आणि चिरलेला कांदा गरम तेल मध्ये परतून घ्या. कांदा,धने पावडर, चिली मिली / गावरान मराठा मसाला, हळद, टोमटोचा रस टाकून तूप सुटे पर्यंत परता. त्यात शिजविलेले चणे टाका. चना मसाला टाका. ५ मिनिटे उकळल्यावर चिरलेली कोथिंबीर, पुदिना टाका. गरम गरम सर्व करताना कांद्याच्या गोल चाक्त्याने सजवा.

भटुरा:
४ वाट्या मैद्यात किंचित बकिंग पावडर, ४ टी-स्पून दही घालून पाण्यात घट्ट २-३ तास भिजवणे. त्याची मोठी पुरी लाटून तेलात तळणे.

Recipe of Pumpkin Kofta Curry/भोपळ्याची कोफ्ता करी

Pumpkin Kofta Curry/भोपळ्याची कोफ्ता करी
Recipe Courtesy: Mrs. Sushila Katare (Author of Khadya Sanskruti)

कोफ्त्यासाठी साहित्य:
१/२ किलो लाल भोपळा, ४-५ टेबल स्पून डाळीचे पीठ, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १/२ लिंबू, हळद आणि मीठ चवीनुसार

मसाल्यासाठी साहित्य: ४-५ हिरव्या मिरच्या, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी पुदिना, पाव जुडी पालक, दीड इंच आले, १ चमचा पल्लविज स्पाईसेसचा शाही गरम मसाला, पाव चमचा हळद

ग्रेव्हीसाठी साहित्य: १ नग कांदा, २ चमचे अनारदाणा (डाळिंब)

कृती:
१) मसाला बारीक वाटून बाजूला ठेवावा
२) कांदा उभा चिरून वेगळा ठेवावा
३) लाल भोपळा किसून त्यातील पाणी पिळून टाकावे. त्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या, डाळीचे पीठ, हळद, जिरे, पल्लविज स्पाईसेसचा शाही गरम मसाला, लिंबाचा रस घालून छोटे छोटे गोळे करून मंद अग्नीवर टाळून घ्यावेत
४) थोड्याश्या तेलावर कांदा परतून घ्यावा. बदामी रंगाचा झाल्यावर वाटलेला मसाला घालून परतून घ्यावा. नंतर बेताचे पाणी घालून उकळून घ्यावा. वाटलेला अनारदाणा व मीठ घालावे. रस्सा दाट झाल्यावर तळलेले कोफ्ते घालून एक उकळी आल्यानंतर गरम सर्व करावा.