Saturday, June 22, 2013

कोल्हापुरी पांढरा रस्सा



कोल्हापुरी पांढरा रस्सा
साहित्य:
लांब चिरलेला पांढरा कांदा, ओले खोबरे, दाट आणि पातळ नारळाचे दुध, मिरे, लवंग, तमालपत्र, आले लसूण पेस्ट, चिकन/मटण स्टोक, काजू, मीठ, हिरवी मिरची

कृती
एका वाटीत - काजू भिजत घालावेत दुसरी मध्ये चमचाभर खसखस. एका तासाने त्या दोघांची छान पेस्ट करावी. नंतर, तेलावर कांदा  खोबरे भाजून घ्यावेजास्त भाजाल तर रस्स्याचा रंग बदलेल म्हणून नीट लक्ष द्यावे. कांदा आणि खोबर्याची बारीक पेस्ट करावी. पुन्हा कढईत तेल तापवून त्यामध्ये मिरे, लवंग आणि तमालपत्र टाकावे. त्यात कांद्या-खोबर्याची पेस्ट मिरच्या टाकून परतायचेतेल सुटू लागले कि काजू, खसखसची पेस्ट घालून थोडा वेळ परतावेमसाला कोरडा होत आला कि चिकन/मटणचा स्टोक घालून हलवायचे. त्यानंतर नारळाचे पातळ दुध घालून हलवत राहायचे. नंतर नारळाचे दाट दुध घालायचे. लक्षात असू द्या कि उकळी आणायची नसते अन्यथा रस्सा फाटायची शक्यता असते.

कोल्हापुरी तांबडा रस्सा



कोल्हापुरी तांबडा रस्सा
साहित्य:
अर्धा किलो मटण, नारळ, आतपाव तीळ, लवंग, थोडी दालचिनी (-), ग्रम सुके खोबरे, आतपाव गोडेतेल, चमचा हळद, - कांदे चवीपुरते मीठ,  - तमालपत्र, / चमचा खसखस, 'Pallavi's Spices' चा गावरान मराठा मसाला/कांदा लसुन मसाला

कृती:
प्रथम मटण धुवून घ्यावे. ते हळद, मीठ आणि आले-लसूणच्या पेस्ट मध्ये मिक्स करावे.  नंतर बारीक चिरलेला कांदा, हळद, खोबरे लवंग तेलात घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा. ते मिश्रण मिक्सर मधून काढावे.
नंतर मोठ्या कढइत तेल गरम करावेत्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, मिरी, खसखस घालून चांगले परतावे. टोमाटो घालावाआता मटण आणि मीठ घालून शिजवत ठेवावेझाकण ठेवून त्यावर पाणी टाकावे. अर्धे शिजल्यावर मसाला पेस्ट आणि गावरान मराठा किंवा कांदा लसूण मसाला घालावापुन्हा शिजू द्यावे. वरून दोन-तीन चमचे तूप घालावे  पूर्ण शिजल्यावर भाकरी किंवा चपाती बरोबर द्यावे

मटन पुलाव



मटन पुलाव
साहित्य: 
अर्धा किलो मटन, अर्धा किलो बासमती तांदूळ , २ कांदे, लांब लांब पातळ चिरलेले, टोमॅटो लांब पातळ चिरलेले, ५-६ लवंगा, ५-६ दालचिनीचे छोटे तुकडे, ८ हिरवी विलायची, ५ काळी मिरी, १ चमचा शहाजिरे, १० लसून पाकळ्या, १ इंच आले, तेल, मीठ, २ चमचे डालडा तूप किंवा आवडत असल्यास साजूक तूप. थोडी कोथिंबीर.
कृती: 
लसून, कोथिंबीर, आले व सर्व गरम मसाला शहाजिरे सर्व बारीक वाटावे. पातेल्यात तेल घालावे. त्यावर थोडा एक बारीक चिरलेला कांदा घालावा. हळद घालावी. कांदा परतला की त्यावर वाटलेला मसाला घालावा. मटन घालून सर्व चांगले परतावे. चवीनुसार मीठ घालावे. सर्व परतून एक ते दीड फुलपात्र पाणी घालून शिजून घ्यावे. मटन अर्धवट कच्चे शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करावा. एका पातेल्यात तेल घालावे. २-३ लवंगा, ३ हिरवी विलायची, दालचिनीचे तुकडे घालावे, १ चमचा शहाजिरे, तमालपत्र घालावे. त्यावर कांदा घालावा. तो दोन मिनिटे परतून झाल्यावर त्यावर टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. तेल सुटे पर्यंत परतावे. नंतर त्यावर तांदूळ धुऊन घालावेत. सर्व चांगले ७-८ मिनिटे मंद गॅसवर परतणे. एका दुसर्‍या भांडयात पाणी गरम करण्यास ठेवावे. तांदूळ परतल्यावर त्यावर आपण शिजवून ठेवलेले मटन घालावे. सर्व हलवून घ्यावे. नंतर आपल्या अंदाजाने गरम पाणी घालावे. मीठ चवीनुसार घालावे. मटन शिजवताना मीठ घातलेले असते. त्या अंदाजाने भातात मीठ घालावे. भाताला एक उकळी आली की गॅस कमी करावा. पातेल्यावर ताटली ठेवावी. भात छान शिजू द्यावा. अधूनमधून हलवावे. आवश्यकता वाटल्यास गरम पाणी घालावे. भात शिजला की वरून तूप सोडावे व मंद आचेवर ८ ते १० मिनिटे तव्यावर पातेले ठेवावे. गरमागरम मटन पुलाव लिंबू व कोशींबीरी बरोबर खाण्यास द्यावा. सोबत तांबडया व पांढर्‍या रश्याची वाटी द्यावी.
मंद आचेवर शिजवावे. काजूमुळे व लोण्यामुळे चिकनला वेगळीच चव व रंग येतो.