Saturday, June 22, 2013

मटन पुलाव



मटन पुलाव
साहित्य: 
अर्धा किलो मटन, अर्धा किलो बासमती तांदूळ , २ कांदे, लांब लांब पातळ चिरलेले, टोमॅटो लांब पातळ चिरलेले, ५-६ लवंगा, ५-६ दालचिनीचे छोटे तुकडे, ८ हिरवी विलायची, ५ काळी मिरी, १ चमचा शहाजिरे, १० लसून पाकळ्या, १ इंच आले, तेल, मीठ, २ चमचे डालडा तूप किंवा आवडत असल्यास साजूक तूप. थोडी कोथिंबीर.
कृती: 
लसून, कोथिंबीर, आले व सर्व गरम मसाला शहाजिरे सर्व बारीक वाटावे. पातेल्यात तेल घालावे. त्यावर थोडा एक बारीक चिरलेला कांदा घालावा. हळद घालावी. कांदा परतला की त्यावर वाटलेला मसाला घालावा. मटन घालून सर्व चांगले परतावे. चवीनुसार मीठ घालावे. सर्व परतून एक ते दीड फुलपात्र पाणी घालून शिजून घ्यावे. मटन अर्धवट कच्चे शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करावा. एका पातेल्यात तेल घालावे. २-३ लवंगा, ३ हिरवी विलायची, दालचिनीचे तुकडे घालावे, १ चमचा शहाजिरे, तमालपत्र घालावे. त्यावर कांदा घालावा. तो दोन मिनिटे परतून झाल्यावर त्यावर टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. तेल सुटे पर्यंत परतावे. नंतर त्यावर तांदूळ धुऊन घालावेत. सर्व चांगले ७-८ मिनिटे मंद गॅसवर परतणे. एका दुसर्‍या भांडयात पाणी गरम करण्यास ठेवावे. तांदूळ परतल्यावर त्यावर आपण शिजवून ठेवलेले मटन घालावे. सर्व हलवून घ्यावे. नंतर आपल्या अंदाजाने गरम पाणी घालावे. मीठ चवीनुसार घालावे. मटन शिजवताना मीठ घातलेले असते. त्या अंदाजाने भातात मीठ घालावे. भाताला एक उकळी आली की गॅस कमी करावा. पातेल्यावर ताटली ठेवावी. भात छान शिजू द्यावा. अधूनमधून हलवावे. आवश्यकता वाटल्यास गरम पाणी घालावे. भात शिजला की वरून तूप सोडावे व मंद आचेवर ८ ते १० मिनिटे तव्यावर पातेले ठेवावे. गरमागरम मटन पुलाव लिंबू व कोशींबीरी बरोबर खाण्यास द्यावा. सोबत तांबडया व पांढर्‍या रश्याची वाटी द्यावी.
मंद आचेवर शिजवावे. काजूमुळे व लोण्यामुळे चिकनला वेगळीच चव व रंग येतो.   

No comments:

Post a Comment