मटन फ्राय
Recipe Courtesy: Ms. Lalita
साहित्य:
अर्धा किलो मटन, २ मध्यम कांदे, १ वाटी खोवलेले ओले खोबरे, थोडी कोथिंबीर, लसून एक मोठे कांडी, आले २ इंच, मीठ चवीनुसार, गावरान मराठा मसाला एक ते दीड चमचा, तेल, हळद.
कृती:
कांदे बारीक चिरून घ्यावेत. आले-लसून खोबरे, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावे. पातेल्यामध्ये तेल घालावे. त्यावर कांदा घालावा. नंतर तो जरा परतला की त्यावर वाटून ठेवलेला मसाला, हळद घालावी, तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यावा. नंतर त्यावर मटन घालावे. चांगले परतावे. चवीनुसार मीठ घालावे. अंदाजाने पाणी घालावे. पाण्याला उकळी आली की मटन चांगले शिजू द्यावे. मटना मध्ये फार रस्सा ठेवू नये. हे मटन घट्टच ठेवावे.
Do let us know your feedback/suggestions on the above recipe.
Share your recipe and introduce the world to your exceptionally good culinary skills.
Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com.

No comments:
Post a Comment