भरली वांगी (with kanda lasun masala)
साहित्य:
साहित्य:
७-८ छोटी काटेरी वांगी, ५ लसूण पाकळ्या, १" आले, १ वाटी - सुक्या खोबरयाचा कीस, शेंगदाण्याचा कुट व बारीक चिरलेला कांदा, १ चमचा चिली मिली मसाला, ३ चमचे कांदा लसुण मसाला, १/२ चमचा गरम मसाला, तेल, हिंग, हळद, मोहरी, चिरलेली कोथिम्बिर.
कृती:
कृती:
आले, लसूण व खोबरे एकत्र वाटून घ्यावे, वांगी,तेल, हिंग, मोहरी सोडून बाकी साहित्य मीठ व २ चमचे तेल घालून एकत्र करावे. वांग्यामध्ये मसाला भरल्यावर हिंग मोहरीची तेलात फोडणी द्यावी व त्यावर वांगी ठेवावी. उरलेला मसाला वरून घालून ५ मिनिटांनंतर वांगी परतून घ्यावी व १ वाटी पाणी घालून १ उकळी येऊ द्यावी. आवडी प्रमाणे रस्सा घट्ट किवां पातळ ठेवावा.
वापर:
कांदा लसूण मसाला तिखट चवीच्या सुक्या व रस्सा भाज्या उदा - भरली वांगी, शेव भाजी, उसळ, मिसळ आणि मटण, चिकन, मासे इ.
व्यंजनांन साठी.
No comments:
Post a Comment