Saturday, June 22, 2013

कोल्हापुरी चिकन



कोल्हापुरी चिकन

साहित्य :  
१/२ किलो चिकन हड्डी व मांस तुकडे, २ टीस्पून चिल्ली मिल्ली/गावरान मसाला, १/२ टीस्पून हळद, ४ चिरलेले कांदे, १/२ किंवा १ किसलेला नारळ (आवडीप्रमाणे), १ टेबलस्पून साजूक तूप/तेल, चवीनुसार  मीठ
वाटणाचा मसाला (गरम मसाला) : १ टीस्पून काळी मिरी, १/२ टीस्पून खसखस, धणे व बडीशेप, २ चिमुट शहाजिरे, ३-४ लवंगा, ३-४ वेलच्या, ५-६ ४ तुकडे दालचिनी (१ इंचाचे). हे सर्व मसाले १ टीस्पून तेलावर खमंग भाजून घ्यावे व वाटावे. (सोपा मार्ग म्हणजे 'पल्लवीज स्पाइसेस' चा १ चमचा गरम मसाला वापरावा)

कृती : 
पातेलयात १ चिरलेला कांदा घ्यावा व गुलाबी रंगावर तुपात/तेलात परतावा. नंतर त्यावर चिल्ली मिल्ली/गावरान मसाला व आले-लसूण लावलेले चिकन, मीठ घालून परतावे व ३-४ वाटया गरम पाणी घालून वाफेवर शिजत ठेवावे. चिकन शिजले कि त्याला वाटणाचा  मसाला लावावा व ५ मिनिटे उकळू दयावे. नंतर त्यात नारळाचा रस टाकून उकळी येईपर्यंत चमच्याने सतत एकजीव होईपर्यंत ढवळत रहावे. बारीक उकळी येऊ लागल्यावर गॅस बंद करावा.

No comments:

Post a Comment