Tuesday, September 24, 2013

Recipe of Pomfret Cutlets/ पापलेट कटलेट्स

Recipe of Pomfret Cutlets/ पापलेट कटलेट्स
Recipe Courtesy: Ms. Poonam Watkar
by using Pallavi's Spices - Shahi Garam Masala

साहित्य:
२ उकडलेले बटाटे, १ भरताचे वांगे, २ टी-स्पून आले, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, १/२ टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा शाही गरम मसाला, १ टी-स्पून धने जिरे पूड, मध्यम पापलेटचे ७-९ तुकडे, २-३ ब्रेड स्लाईसेस व चवीनुसार मीठ

कृती:
मासे नुसत्या वाफेवर १० मिनिटे शिजवून काटे व कातडी काढून फ़क़्त मांस घ्यावे. वांगे भाजून भरीताप्रमाणे बारीक करावे. नंतर उकडलेले बटाटे, बारीक केले वांगे, हलके भिजविलेला ब्रेडचा चुरा, मासे, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर व मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावा. त्याचे कटलेट्स बनवून वरच्यावर रव्या मध्ये घोळून तेलात खरपूस परतावेत. गरमागरम पापलेटचे कटलेट्स मग चटणी, कांदा, टोमाटो बरोबर सर्व करावे.

Do let us know your feedback/suggestions on the below given recipe once you try it. Share your own specialty and let the world enjoy it too.

Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com

No comments:

Post a Comment