Recipe of Dry Mutton/ Mutton Roast / सुके मटण मसाला / मटण रोस्ट
Recipe Courtesy: Ujjawala Bhosale
Recipe Courtesy: Ujjawala Bhosale
साहित्य:
१/२ किलो मटण, ४ उभे कांदे चौकोनी चिरलेले, १/२ लिंबू, २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २-३ दालचिनीचे तुकडे, ३-४ लवंग, थोडे वेलदोडे, १ कप मटण सूप, १ टेबल स्पून आले लसूण पेस्ट, १ टी-स्पून पल्लाविज स्पाईसेसचा गावरान मराठा मसाला, चवीनुसार मीठ, १/२ वाटी वाटलेला तिखट मसाला (कांदे, भाजलेले खोबरे त्यामध्ये आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ) गरम मसाला (दालचिनी, लवंग, वेलदोडे) बारीक पूड करून घ्या.

कृती:
पहिल्यांदा मटण हळद, मीठ, आले लसूण पेस्ट व थोडेसेच पाणी टाकून शिजवणे. कढाई मध्ये गरम तेलामध्ये चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात मिरच्या टाका. नंतर वाटलेला मसाला, लवंग, दालचिनी-वेलदोडे पूड टाका. गावरान मराठा घालून परतून घ्या. त्यामध्ये शिजविलेले मटण व सूप टाकून तेल सुटे पर्यंत परता. वरून चिरलेली कोथिम्बिर व लिंबू पिळून सर्व करा.

No comments:
Post a Comment