Recipe of Shahi Kebab/शाही कबाब
Recipe Courtesy: Shambhavi Bapat
Recipe Courtesy: Shambhavi Bapat
साहित्य:
१ कप भिजवलेली चना डाळ, १ टेबल-स्पून आले, ४ हिरव्या मिरच्या, ५-६ लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप बारीक चिरलेला कोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांद्याच्या पातीचा कांदा, थोडासा सोडा, १ टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला, १ टी-स्पून धने, जीरा, आणि थोडीशी कोथिम्बिर बारीक चिरलेली, तेल आणि चवीनुसार मीठ

कृती:
भिजविलेल्या चना डाळीत आले, हिरव्या मिरच्या, मीठ आणि लसुन घालून वाटून/मिक्सर मधून काढा. मग त्यामध्ये बाकीची सामग्री घालून एकजीव करून हाताने कबाब बनवा. खरपूस तांबूस लाल होईपर्यंत ते तळून घ्या. गरम गरम शाही कबाब चटणी आणि सौस बरोबर थोडी कोथिम्बिर, काकडी, कांद्याच्या चकत्या अशी सजावट करून खायला द्या.

No comments:
Post a Comment